दैनिक चालु वार्ता अहमद्पुर तालुका प्रतिनिधी -विष्णु मोहन पोले
अहमद्पुर : तालुक्यातील मन्याड च्या कुशीत वसलेलं सुमठाना हे गाव बाळू मामाच्या भक्ती साठी आणी सेवेसाठी पंचक्रोशीत ओळखलं जात. काही वर्षांपूर्वी या गावात श्री संत बाळू मामाच्या मेंड्यांचा पालखी सोहळा आला होता आणी त्या दरम्यान तिथे वानर आणी एक मेंढी मरण पावली तेंव्हा गावकर्यांनी मिळून बाळू मामांच मंदिर बनवायचं ठरवलं आणी बांधलं पण आणी तेंव्हा पासून दर अमावश्याला या गावात बाळू मामाची आरती संपन्न होते.पूर्ण पंचक्रोशीतील भाविकांचि उपस्थिती असते”.बाळू मामाच्या नावान चांगभलं ” या भक्तिमय घोषात प्रत्येक भाविक असतो.आरती निमित्त या गावाला यात्रेच स्वरूप येत.आरती नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असतो.गावातील युवक,वडील धारी मंडळी,आणी महिला यांचा महाप्रसाद वाढण्यात अग्रगण्य सहभाग असतो.भक्तीभाव आणी येथील शिस्त खरंच कौतुकास्पद आहे.भविष्यात हे गाव तीर्थ क्षेत्रा च्या यादीत आलं तर नवलं वाटणार नाही.


