दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनीधी अहमदपुर-विष्णु मोहन पोले
दि.२१/१/२०२३ रोजी मॉडेल इंग्लिश स्कूल अहमदपूर येथे “हळदी कुंकू” तसेच त्यासमवेत शालेय विर्यार्थ्यांसाठी ” आनंद नगरी” हे दोन्ही कार्यक्रम पार पाडण्यात आले. शालेय व्यवस्थापनाच्या संघटनेतील एक महत्वाचा भाग असणाऱ्या पालकवर्गाशी कायम सलोख्याचे संबंध प्रस्तापित करणेव विद्यार्थी दशेतच मुलांना जबाबदारी, व्यवहार, तडजोड या मुल्यांचे संस्कार रूपवणे हाएकवेव उद्देश ठेवूनच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास बालाघाट ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या संस्थाचालिका आदरणीय सौ. डॉ. वर्षाताई पांडूरंग कदम यांनी आपली उपस्थिती दर्शविली.
इ.५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी विवीध व रुचकर पदार्थांचे स्टॉल लावून सर्व पालक वर्गाचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः महिला पालकवर्गाने उत्सफुर्तपणे विद्यार्थ्यांच्या या स्वावलंबी उपक्रमात मोलाचे सहकार्य केले. आदरणीय सौ. डॉ. वर्षाताई पांडूरंग कदम मॅडम, प्राथमिक वि. मुख्याध्यापक श्रीराम क्षीरसागर सर, माध्यमिक वि. मुख्याध्यापक श्री कुमठेकर सर, उप मुख्याध्यापीका सौ ठाकूर मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. वंदे मातरम या राष्ट्रमंत्राने या मंगल कार्यक्रमाची सांगता करण्यात आली….


