दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सु.) : अंजनगाव सुर्जी शहरातील सुर्जी विभाग हा ग्रामीण भागात मोडत असल्याने सरकारने नियोजित दर पाच ते तीस हजार लोकसंख्येमागे असलेली उपकेंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्र या मार्फत नागरिकांना आरोग्य सेवा मिळायला पाहिजे;परंतु सुर्जी विभागातील उपकेंद्रात असे दिसून येत नाही.उपकेंद्राला डॉक्टरच उपलब्ध नसल्याने आरोग्य सेवेत मिळणाऱ्या व औषधींचा तुटवडा निर्माण होत असून नागरिकांच्या आरोग्य सेवेकडे शासनाचे दुर्लक्ष होत असताना दिसत आहे.
सविस्तर माहिती अशी की,दिनांक २३ जानेवारी सोमवार रोजी दैनिक चालु वार्ता जिल्हा प्रतिनिधी यांनी भेट दिली असता अंजनगाव सुर्जी शहरातील सुर्जी भागात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.तेथील उपकेंद्रात लॅब टेक्निशियन,फार्मासिस्ट व आरोग्य सेविका उपलब्ध आहेत.परंतु ज्यांच्या मार्फत नागरिकांना आरोग्य सेवेच्या सोयी-सुविधा दिल्या जातात ते डॉक्टरच येथील उपकेंद्राला शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे नियुक्त केल्या गेले नाही.डॉक्टर अभावी या उपकेंद्राला औषधींचा पुरवठा उपलब्ध करून दिल्या जात नसल्यामुळे शासनाचे नागरिकांच्या आरोग्याकडे कितपत लक्ष आहे हे दिसून येते.
—————————————-
सुर्जी येथील उपकेंद्राला लवकरात-लवकर सर्व सोयी सुविधा पुरविण्याबाबत तसेच नागरिकांच्या आरोग्य सेवेबाबत प्रश्नांचे निराकरण करण्यासंबंधी पाठपुरावा करणार.
▪️आ.बळवंत वानखडे
—————————————-
—————————————-
एमबीबीएस डॉक्टर वेळेवर उपलब्ध होत नाही तसेच नियुक्त अटेंडन्स नोकरी सोडून गेल्यामुळे ती जागा पण रिक्त आहे.
▪️डॉ.सुधीर डोंगरे,तालुका वैद्यकीय अधिकारी,अंजनगाव सुर्जी


