
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी-लक्ष्मण कांबळे
नांदेड/उस्माननगर :- शिराढोण तालुका कंधार येथील पंचशील बुद्ध विहार येथे दिनांक २८जानेवारी रोज शनिवार या दिवशी बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनाचे आयोजन केले आहे. त्या अनुषंगाने पंचशील बुद्ध विहार शिराढोण येथे दि.१८ जानेवारी रोज बुधवार पासून महिला( बौद्धउपासिका )धम्म प्रशिक्षण शिबिरास सुरुवात झाली आहे. या प्रशिक्षण शिबिरात एकूण जवळपास ४२ महिलांनी सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षणामध्ये बुद्ध चरित्र ,भीमचरित्र, पंचशीलेचा अर्थ, अष्टांगिक मार्ग ,बाबासाहेबांनी दिलेला संदेश, १० पारीमिता, बौद्ध धमीय मूर्ती पूजा आणि त्यांचे महत्त्व, आदर्श स्त्री रत्ने अंधश्रद्धा व बुवाबाजी बौद्धांचे सण आणि मंगलदिन अशा एकूण वीस विषयावर महिलांना मार्गदर्शन भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय शिक्षिका आयुष्यमती सुजाता अशोक आढाव हे प्रशिक्षण देत आहेत या धम्म प्रशिक्षण शिबिरांचा समारोप दिनांक २८जानेवारी रोजी बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना या दिवशी डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे