
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
निष्ठवंत शिवसैनिक मेळाव्याला हजारो शिवसैनिकांची उपस्थिती
शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांचे यशस्वी आयोजन
—————————————-
अमरावती (नांदगाव खंडेश्वर) :- शिवसेना सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्त्यान मुळेच नेता घडतो असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी खासदार अनंत गुढे यांनी केले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी निष्ठावंत शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिना निमित्ताने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर हे दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात आज नांदगाव शहरातून ऐतिहासिक भव्य हिंदुत्व बाईक रॅली व मशाल यात्रा काढण्यात आली या रॅलीत पाचशे बाईक घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते शिवसेना प्रमुखांचा जय जयकार करत जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाबाजीने शहर दणाणून सोडले भगवा झेंडा हातात घेऊन गजानन महाराज मंदिर येथून रॅलीला सुरवात करण्यात आली रॅलीचा समारोप निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा घेऊन करण्यात आला यावेळी हजारो शिवसैनिक मेळाव्याला उपस्थित होते निवडणूक आलेल्या नवीन सरपंचांना बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा व शॉल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश सुद्धा केलायावेळी मेळाव्याचे अध्यक्ष माजी खासदार अनंत गुढे शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सुर्यवंशी सहसम्पर्क प्रमुख बाळासाहेब भागवत जिल्हाप्रमुख मनोज कडू माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील महिला आघाडीच्या जोती अवघड शोभा लोखंडे रेखा नागोलकर उपजिल्हाप्रमुख प्रमोद कठाळे बाळासाहेब राणे रेवती परसंनकर छाया भारती प्रमोद कोहळे विलास सावदे प्रमोद ठाकरे दिलीप देवतळे प्रीती इखार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते मेळाव्याच्या यशस्वीते करिता निलेश इखार सुनील गुरमुळे भूषण दुधे रवी ठाकूर वासुदेवराव लोखंडे मधुकर कोठाळे अक्षय राणे आशिष हटवार गोपाल बनकर आशिष भाकरे चेतन धवणे रवींद्र दांडगे भारत तिरमारे भूषण शिरभाते शुभम सावरकर मंगेश सुरोसे गजानन गावंडे आकाश रुमने गजानन झिमटे श्याम मुळे शुभम रावेकर मनदेव चव्हाण दिलीप देवतळे भानुदास उगले शुभम सावरकर भूषण मोरे अक्षय काकडे अक्षय तुपट बाळू सोळंके अभय बनारसे सुरज लोमटे कमलेश मारोटकर लीलाधर चौधरी यांनी परिश्रम घेतले
पक्ष सोडून नेते गद्दार झाले कार्यकर्ता मात्र प्रामाणिक:- सुधीर सूर्यवंशी
अनेक नेते शिवसेच्या भरवशावर मोठे झाले पण स्वार्थासाठी पक्षा सोबत गद्दारी करून पक्ष सोडला मात्र कार्यकर्ता आजही प्रामाणिक आहे असे मत शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुधीर सुर्यवंशी यांनी व्यक्त केले
शंभर कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात नांदगाव खंडेश्वर शहर लोणी टाकळी येवती पहूर येथील विविध पक्षाच्या शंभर कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला नांदगाव मधील योगेश ढोरे महेंद्र डकरे सुनील बावणे रुपेश बेहरे पावन नवरे आकाश नेवारे संतोष चौधरी दिनेश पकडे निलेश कुकडे यांचेसह लोणी टाकळी येथील बंटी डाखोरे यांच्या नेतृत्वात १०० कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.