
दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम:- शहरातील रवींद्र हायस्कूलच्या बाजूला असलेली स्म्शान भूमीत पिढ्या नं पिढ्या बौद्ध समाज अंत्यविधी करत आहे. पण ही जागा अद्याप शासन दरबारी बौध्द स्म्शानभूमी म्हणून नोंद केलेली नाही. या संदर्भात गेल्या ऑगस्ट महिन्यात १३ ऑगस्ट रोजी स्म्शान भूमीत सरनावर बसून ऑल इंडिया पँथर सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष चंद्रमणी गायकवाड यांनी आमरण उपोषण केले होते. त्यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी बौद्ध स्म्शान भूमिची फाईल पूर्ण करुन जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना पाठवतो व दोन महिन्यात सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन नोंद करुन देऊअसे लेखी आश्वासन दिले होते पण अद्याप त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे पुन्हा स्मशान भूमीतच सरणावर आमरण उपोषणास विकी जावळे, अजित सोनवणे, चंद्रमणी गायकवाड हे उपोषणास बसले आहेत.