
दैनिक चालु वार्ता अहमद्पुर प्रतिनिधी-विष्णू मोहन पोले
हाडोळती- हाडोळती तालुका अहमदपूर येथील दयानंद विद्यालयाने 9 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात आलेल्या एम.टी.एस.परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेअसून सदरील परीक्षेत दयानंद विद्यालय, हडोळतीचे तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात कुमारी पवार सुप्रिया मुक्तीराम , गादेवार उपेंद्र उल्हास, शेख हुजेब शुकुरसाब हे तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.सदरील परीक्षेत सुप्रिया पवार हिने विशेष पारितोषिक प्राप्त केले आहे. त्यामुळे त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या या विषयाबद्दल संस्था अध्यक्ष प्रा. पी.टी. पवार सर ,सचिव निलेश भैय्या पवार, मुख्याध्यापक जोगदंड आय. एम. पर्यवेक्षक अशोक कोटसूळवार, परीक्षा प्रमुख यंचलवाड पी.टी., शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व गावातील नागरिक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.