
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
शहरात पंचायत समितीकडून तालुकास्तरीय चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आले होते . याठिकाणी रांगोळी स्पर्धेत तालुक्यातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचा बारावी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी सचिन नवेकर याने पटकावला आहे . यानंतर पहिल्या दहामध्ये सुध्दा अकरावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु.आदिती भालेराव ही यश संपादन केली आहे . रांगोळी म्हणजे केवळ स्त्रीच सुरेख व मोहक काढू शकते असे समाजात असणारे गैरसमज दूर करून 1200 स्पर्धकातून विद्यार्थी सचिन हा यशस्वी झाला आहे .
पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात पंचायत समिती सभापती प्रतिनिधी लक्ष्मण पाटील खैरकेकर , ग्रामीण महाविद्यालय , वसंतनगरचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड , जेष्ठ पत्रकार किशोर चौहान , सुधीर चव्हाण इत्यादी राजकीय व प्रशासकीय अधिकारी हे उपस्थित होते . या समारंभात सचिन नवेकर या विद्यार्थ्यांला रोख 7000 रक्कम , शाल , श्रीफळ , चषक , पुष्पहार आणि कु.आदिती भालेराव हिला रोख 2000 रक्कम , शाल , श्रीफळ, पुष्पहार देऊन गौरविण्यात आले . यावेळी पुरस्कार स्विकार करताना महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित प्रा.धनंजय वडजे , प्रा.राजेश्वर कांबळे यांचा देखील सत्कार करण्यात आला .
या यशाबद्दल वीरभद्र शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते , मराठी विभाग प्रमुख प्रा.सी.बी.साखरे , पर्यवेक्षक प्रा.जी.एम.वायफणकर , प्रा.डी.बी.साखरे , अधिक्षक एस.के.सुर्यवंशी , प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून कौतुक केले आहेत .