
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
प्रभू श्री विश्वकर्मा सार्वजनिक जयंती उत्सव सोहळा दि. ३ फेब्रुवारी रोजी लोहा शहरात आयोजित करण्यात आला असून, त्या निमित्त भव्य मिरवणूक, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन जयंती उत्सव समितीकडून करण्यात आले आहे.
विश्वकर्मा सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते १० वेळेदरम्यान लोहा शहरातील देवुळगल्ली ते व्यंकटेश गार्डन मंगल कार्यालयापर्यंत टाळ मृदंगाच्या गजरात तसेच ढोल ताशांच्या निनादात भव्य मिरवणूक आयोजित केली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हभप आत्माराम महाराज रामेज्वार रायवाडिकर तालुकाध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ लोहा हे असुन. सदरील समारोपीय कार्यक्रम सोहळ्यास आ. श्यामसुंदर शिंदे, आ. मोहन अण्णा हंबर्डे, माजी आ. रोहिदास चव्हाण, जि. प. सदस्या प्रणिता देवरे-चिखलीकर, शिवा संघटनेचे प्रमुख प्रा. मनोहर धोंडे, भाजप नेते एकनाथ दादा पवार, सेवानिवृत्त सनदी अधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अनिल मोरे, वंचितचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष दत्ता वाले, माजी उपनगराध्यक्ष शरद पवार, भीमाशंकर मामा कापसे आदींची उपस्थिती राहणार आहे. सकाळी ११ ते १ दरम्यान झी टॉकीज फेम हभप प्रकाश महाराज साठे बिडकर यांचे कीर्तन तर दुपारी २ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील जयंती उत्सव सोहळ्यास समस्त धार्मिक व भाविक मंडळिने बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विश्वकर्मा सार्वजनिक जयंती महोत्सव समिती लोहा च्या वतीने करण्यात आले आहे.