
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर:बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी परिसरात असलेल्या शिव- रातील मांजरा नदी पात्रातून महाराष्ट्र शासनाच्या मालकीची वाळू तेलंगणातील वाळू माफिया पळविताना पाच ट्रॅक्टर मंडळ अधिकाऱ्यांनी पकडले. परंतु या माफियांनी मंडळ अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत वाळूने भरलेले ट्रॅक्टर्स तेलंगणात पळवून नेले या प्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात चालक, ट्रॅक्टर मालक आणि इतर दहा अशा २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दि. २८ जानेवारीच्या रात्री ११.३० च्या
असलेल्या नागणी शिवारातून तेलंगणा येथील वाळू माफिया बिनबोभाटपणे महाराष्ट्र शासनाच्या मालकी हक्काची वाळू विना- परवाना बेकायदेशीररित्या ट्रॅक्टर, टिप्परमधून चोरून नेतात. असेच पाच ट्रॅक्टर वाळू भरून तेलंगणात जात असताना या विभागाचे मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत अंबेराय यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाळूमाफियांनी त्यांच्याशीच धक्काबुक्की करत भरलेले ट्रॅक्टर तेलंगणात पळवून नेले. यावेळी लक्ष्मीकांत अंबेराय
यांच्या फिर्यादीवरून कुंडलवाडी पोलीस ठाण्यात शब्बीर खान रा. हंगरगा ता. बोधन जि. निजामाबाद, अजहर बेग रा. कोपरगा ता. बोधन, सय्यद नसीर रा. कोपरगा ता. बोधन, सय्यद सलमान रा. कोपरगा ता. बोधन, नजीर सय्यद उर्फ पैलवान रा. कोपरगा ता. बोधन असे पाच चालक, ट्रॅक्टरचे पाच मालक आणि इतर दहा अशा २० जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळासह आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले करत आहे