
दैनिक चालु वार्ता हातकणंगले प्रतिनीधी. –
इंगळी गावचे प्रसिद्द साहित्यक,पत्रकार,लेखक,कवी सरकार इंगळी यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन पुष्परत्न साहित्य, समूहचे संस्थापक,व आहिरे स्पर्धा अॅकेडमीचे सर्वेसर्वा मान.प्रा.डाॅ.आनंद आहिरे यांनी निवडपत्र दिले आहे.
*पहिले राष्ट्रीय प्रवासी कविसंमेलन नाशिक ते गोवा व पुष्परत्न काव्य गौरव सन्मान सोहळा होणार गोवा राज्यात, कार्यक्रमाध्यक्ष पद्मश्री मा. विनायक खेडेकर तर आयोजक प्रा. डॉ. आनंद आहिरे*.*पद्मश्री पुरस्कार प्राप्त गोवा राज्य,जेष्ठ साहित्यिक, मा.विनायक खेडेकर कार्यक्रमाध्यक्ष तर गोवा राज्य माहिती आयुक्त मा. संजय ढवळीकर व मा.डॉ. सुनीता उमरस्कर ( मराठी विभाग प्रमुख गोवा विद्यापीठ ) आणि मा. तुळशीदास देसाई, मुख्याध्यापक, मुरगाव हायस्कूल वास्को, गोवा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत*
जागतिक कवी व साहित्यिकांचे हक्काचे विचारपीठ असणारे पुष्परत्न साहित्य समूहाचे संमेलन गोवा राज्यात दि.3 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी 2023 रोजी भारतातील 1ले राष्ट्रीय प्रवासी कविसंमेलन (नाशिक ते गोवा ) जागतिक कवी व साहित्यिकांचे हक्काचे विचारपीठ असणारे पुष्परत्न साहित्य समूह, नाशिक तर्फे होत आहे. ,महाराष्ट्र व विविध राज्यातून साहित्यिक 3 ते 5 फेब्रुवारी 2023 सर्वजण एकत्र राहणार , मा. डॉ. ख र. माळवे ( उपाध्यक्ष, पर्यटन, कला,संस्कृती समिती, महाराष्ट्र शासन) ज्यांनी 44 वर्ष व्यावसायिक रंगभूमीवर मुख्य अभिनेते म्हणून काम केले. असे *मा. श्रीप्रकाश सप्रे( अभिनेते व दिग्दर्शक ) मा. डॉ. संघर्ष सावळे ( अर्थशास्त्र विभाग, BAMU, संभांजीनगर.
सदरचा पुरस्कार सोहळा व संमेलन रविवारी 5 फेब्रुवारी ला गोवा राज्यात, मुरगाव हायस्कूल वास्को येथे आयोजन केले आहे. तसेच इतर साहित्य क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या कार्यविरांचा जीवन गौरव व पुष्परत्न काव्यगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.