
दैनिक चालु वार्ता रायगड /म्हसळा – अंगद कांबळे
म्हसळा तुरुंबाडी- हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने माजी खासदार अनंत गीते,जिल्हासंपर्कप्रमुख संजय कदम यांच्या मार्गदर्शना नुसार म्हसळा तालुक्यातील शिवसेना तुरुंबाडी गाव शाखाप्रमुख पदी यशवंत चव्हाण यांची निवड करण्यात आली.उपशाखा प्रमुखपदी महेंद्र चव्हाण,युवासेना शाखाअधिकारी सुदर्शन चव्हाण,उपशाखा अधिकारी रामचंद्र मोजेनाक यांची निवड करण्यात आली त्यांच्या निवडीचे पत्र तालुका प्रमुख सुरेश कुडेकर यांनी सुपुर्द करून शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांच्या समावेत माजी तालुकाप्रमुख नंदू शिर्के,उपतालुका प्रमुख भाई कांबळे,राजाराम तिलटकर,बाळा म्हात्रे,उपशहर प्रमुख दिपल शिर्के,विष्णू कारभारी,कैलास कारभारी,गणेश चव्हाण आदी शिवसेना युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.