
दैनिक चालु वार्ता अहमदपूर तालुका प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- अहमदपूर तालुक्यातील मौजे ढाळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झोपडपट्टी येथील विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा पार पडला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढाळेगाव (झोपडपट्टी )ही इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत असलेली शाळा या शाळेत एकूण 40 विद्यार्थी शिकतात या शाळेत बहुतांश गोरगरीब, मजूर, कामगारांची मुलं शिकतात शाळेत जेमतेम फक्त दोनच शिक्षक असताना देखील पालक व गावकऱ्यांच्या मदतीने जिल्हा परिषद शाळेत शिकणारी मजुरांची मुले ही कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.
या शाळेतील चिमुकल्यांनी इंग्रजी भाषण, नृत्य , प्रबोधन पर नाटक इत्यादी विविध कला व गुणांचे अगदी सुंदर सादरीकरण केले कोणत्याही प्रशिक्षकाशिवाय फक्त माता पालक यांच्या मदतीने डोळ्याचे पारणे फिटावे अशी कला प्रदर्शित केली. चिमुकल्यांच्या कलेने पंचक्रोशीत एकच चर्चा ऐकायला मिळते ती म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा बाल आनंद मेळावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय कांबळे शालेय व्यवस्थापन समिती ढाळेगाव झोपडपट्टी हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे होते प्रमुख अतिथी म्हणून सरपंच मनीषा भिंगे उपसरपंच शिवाजीराव भिकाने जिल्हा परिषद सदस्य मुद्रिका ताई भिकाने तसेच शिंदे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कदम शंकरराव सर माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आरदवाड बी बी सर पोलीस पाटील जयश्री परगे चेअरमन उत्तमराव पाटील तंटामुक्ती अध्यक्ष रावसाहेब शेकडे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अमरदीप कांबळे ग्रामसेवक राजेंद्र कांबळे यांची उपस्थिती होती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झोपडपट्टीचे मुख्याध्यापक श्री इरले एस जी व सहशिक्षिका गुदळे मॅडम यांनी पालक व गावकऱ्यांच्या मदतीने यशस्वी कार्यक्रम घेतल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमादरम्यान या बालकलाकारांना भरभरून टाळ्यांचा गडगडाटासह आर्थिक बक्षिसांचा वर्षावही केला गेला कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक इरले सर यांनी एकूण 12,222 रुपये चे रोख बक्षीस जमल्याचे जाहीर केले या कार्यक्रमाचे औचित्य साधून अपूर्वा टूर्स अँड ट्रॅव्हल्स मुंबईचे मालक भास्कर शिवाजी कांबळे यांच्याकडून प्रति मुलास एक बॅग अशा एकूण 40 स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेवाडी येथील शिक्षक रड्डेवाड रामदास एकनाथ यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढाळेगावच्या सहशिक्षिका गुदळे मॅडम यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवानिवृत्त मुख्याध्यापक कांबळे बी ए सामाजिक कार्यकर्ते रामनाथ पलमट्टे ,नामदेव पिटलवाड रंजीत कांबळे राहुल कांबळे पांडुरंग कांबळे इत्यादी ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले