
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी .
मौजे वन्नाळी ता. देगलूर जि. नांदेड येथील पशु वैद्यकीय दवाखान्याच्या आजुबाजुला खूप मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
पशुवैद्यकीय दवाखान्याच्या शासकीय परिसरामध्ये गावातील नालीचे पाणी आणि समोरच प्रात:विधी करत असल्यामुळे. डॉक्टरांना पेशंट तपासण्यास अत्यंत त्रास होत आहे.”आधीच हाऊस अन् त्यावर पडला पाऊस” त्यामुळे डॉक्टरांना ऐतीच संधी यामुळे मिळाली. दुपारी दोन-तीन वाजताच ते पशु वैद्यकीय दवाखाना बंद करून जातात. आमचे पत्रकार प्रतिनिधी त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की वारंवार घाणी संदर्भात गावातील सरपंच आणि देगलूर येथील डॉ. सुरेश पाशमर यांनाही सांगितलं याची दखल कोणी घेत नाही. त्यामुळे आम्हाला येथे बसण्याचा त्रास होत आहे.याला जबाबदार कोण? घाणीच्या साम्राज्य बाबत व कर्मचारी उपस्थिती बाबतीत काय कार्यवाही करण्यात येईल याची सर्वत्र चर्चा रंगत आहे.