
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
सावता परिषदेचा १६ वा वर्धापन दिन भरणेवाडी तालुका इंदापूर जि.पुणे या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे मा. पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यमंत्री आमदार दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीमध्ये सावता परिषदेचा १६ वा वर्धापन दिन भरणेवाडी या ठिकाणी श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांना पुष्पहार घालून संपन्न झाला.
यावेळी शुभेच्छा देताना आमदार दत्तामामा भरणे म्हणाले सावता परिषदेचे कार्य महाराष्ट्रात खूप मोठे आहे. संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे साहेबांनी खूप मोठ्या संघर्षातून उभा केले आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या इंदापूर तालुक्याचा सुपुत्र सावता परिषदेचे प्रदेश मुख्य संघटक संतोष राजगुरू हे माळी समाजाचे जाळ. विणण्याचं काम आखाडे साहेबांचे विचार, आखाडे साहेबांची समाजाविषयी असलेली तळमळ, समाजाचे संघटन,महाराष्ट्रभर करत आहेत. कल्याण आखाडे व सावता परिषदेच्याच्या माध्यमातून माळी समाजाला दिशा देण्याचे काम सावता परिषद ही संघटना करते. असे गौरवोद्गार आमदार दत्तामामा भरणे यांनी काढले.
कल्याण आखाडे ही एक व्यक्ती नसून माळी समाजाचे समाज मान्य नेतृत्व आहे.प्रचंड मोठ्या प्रमाणात सावता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठे संघटन माळी समाजामध्ये निर्माण केले आहे समाज मान्य असणारी ही संघटना आहे यावेळी प्रदेश मुख्य संघटक संतोष राजगुरू म्हणाले यापुढील काळामध्ये संस्थापक अध्यक्ष.कल्याण आखाडे साहेबांच्या माध्यमातून माळी समाजातील तरुणांची फळी उभा करून.महाराष्ट्र भर.सावता परिषदेचे विचार कल्याण आखाडे साहेबांचे विचार माळी समाजामध्ये पेरण्याचं काम मी करणार आहे.माळी समाजा च्या अस्मितेच्या प्रश्नावरती वेळोवेळी आवाज उठवण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून आखाडे साहेबांनी केलेल आहे. या कार्यासाठी समाजाने आशीर्वाद रुपी आम्हाला पाठबळ द्यावं. यावेळी उपस्थित छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲड. लक्ष्मण शिंगाडे, सावता परिषदेचे प्रदेश मुख्य संघटक संतोष राजगुरू,जिल्हा उपाध्यक्ष राहुल ननवरे, तालुका अध्यक्ष प्रकाश नेवसे, तालुका युवा आघाडी अध्यक्ष अमर बोराटे, तालुका कार्याध्यक्ष विष्णू झगडे, तालुका संघटक सुहास बोराटे, इंदापूर तालुका सोशल मीडिया प्रमुख सचिन शिंदे, भोडणी शाखाध्यक्ष अजय गवळी, मार्गदर्शक रामदास बनसोडे, दादासाहेब भिसे, विजय महाजन, विकास सोसायटीचे संचालक महादेव शेंडे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.