
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर:शहरात चोरी करून खून करण्यात आल्याने शहरासह जिल्हाभरात या गुन्ह्याची दहशत निर्माण झाली होती. शहरात दरोडा व हत्या घडल्याने अख्खे नांदेड जिल्हा हादरले होते पण, देगलूर शहरातील पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक सोहम माचरे, सह पोलीस निरीक्षक मल्लाळे, पोलीस निरीक्षक मोरे, पोलिस उप निरीक्षक मुंडे, पोलीस कर्मचारी मुंडे तसेच संपूर्ण देगलूर पोलीस यंत्रणेने अवघ्या कांहि तासातचत्या सर्व आरोपींना सापळा रचून यंत्रणेच्या सहाय्याने बेड्या ठोकल्या. देगलूर पोलीस प्रशासनाची धडाकेबाज कामगिरीलक्षात घेऊन पोलीस प्रशासनाचे देगलूर शिवसेना (उ. बा. ठाकरे गट) यांच्या बतीने सत्कार करण्यात आले. कर्तव्यदक्षउपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देगलूर सचिन सांगळे यांच्या नेत्रत्वात पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांच्या मार्गदर्शनात सर्व टिमचे सत्कार करण्यात आले यावेळी पूणे येथिल उद्योजक तथा रामपूर येथील रहिवासी शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते सिद्धार्थ पांडवे, शिवसेनेचे उप ता. प्रमुख पांडुरंग पा. थडके देगांवकर, शिवसेनेचे शहर संघटक भगवानदादा जाधव, रामपूरचे सरपंच पांडवे, शहर समन्वयक विनोदभाई सोनकांबळे, होट्टलचे शाखाप्रमुख व सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते.