
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे आज चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे शेतकऱ्यांना न्याय हक्कासाठी आंदोलन करण्यात आले, आणि कापसाला १००००/ रू.,सोयाबीनला ७०००/रू हमी भाव द्यावा तसेच सी.सी.आय ची खरेदी त्वरित सुरू करावी, चना व तुरीची नाफेड मार्फत आँनलाईन नोंदणी सुरू करावी या मागण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बस स्टँड चौक दारव्हा येथे हजारो शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी दारव्हा तालुका प्रमुख अजयभाऊ गाडगे, शहर प्रमुख अमोलभाऊ दुधे, माजी सभापती रामहरीभाऊ लोखंडे ,पं.स.सदस्य माणिकभाऊ राठोड,संतोषभाऊ ठाकरे, उपसभापती जयश्रीताई मिरासे, माजी नगरसेवक रवीभाऊ तरटे, युवासेना शहर प्रमुख विक्की जामणकर, तालुका संघटक सुधाकर पिंगाणे, उपतालुकाप्रमुख रमेश महल्ले, रामेश्वर गिरी, नानाभाऊ गावंडे, गोपाल गायकवाड,ललीताताई ढोके, निसार टेलर, संजयभाऊ देशमुख,लखन मानकर, अनिल महाराज जामगडे, विलास राठोड,तेजस कांबळे, संतोष नारनवरे, देवराव सरतापे, रामा लोंढे, सुरेश चतुर, प्रकाश चौधरी, गजानन केंबल, स्वप्नील मापारे, क्रिष्णा निंबर्ते,मयुर बुंधे, बाबुलाल चव्हाण,वहीद खासाब, पिंकेश देशकरी, गणेश थेर,अन्वर खान, दिनेश मैंद,किरण देशमुख , गोपाल भोयर, शंकर नागलवाडे, प्रशांत भोगे,साजुसिंग जाधव, अनिल देशमुख, माजी सरपंच सुनील चव्हाण, प्रशांत तुळजापुरे, दिलीप राऊत, विजय डांगरा, विजय जाधव, संजय तुळजापुरे, गजानन डकरे,संजय उघडे, बाबाराव थोरात, सुभाष गायकवाड,गोपाल इ़गोले ,सकरू आडे,डिगांबर खाडे यांच्या सह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.