
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अमरावती शहरात काल रात्री गस्त सुरू असताना रहाटगाव रोडवरून पंचवटी चौकाच्या दिशेने दोघे जण भांग घेऊन येत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती आणि ज्या बॅगेत भांग आहे त्या बॅगेवर एनझेडआर १००० असे चिन्हांकित होते.माहिती देणाऱ्या व्यक्तीने पोलीसांना गांजा आणणाऱ्या दोघांचे नाव आणि त्यांचे चेहरा रूपरेषा दिला होता.ज्यामुळे पोलीसांनी सापळा रचून मिळालेल्या माहितीच्या आधारे वेलकम पॉईंटजवळ २ जणांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून एनझेडआर १००० चिन्हांकित बॅगमध्ये १२.३६० किलो गांजा जप्त केला.जप्त केलेल्या मालाची किंमत सुमारे ४ लाख रुपये आहे.
याबाबतची माहिती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी आज त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.सीपी नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले की,दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.अताउर रहमान मोहम्मद शमू (२७,चुनारपुरा,शिरजगाव कसबा टाऊन,चांदूर बाजार) आणि एजाज खान उर्फ अज्जू सलीम खान (२७,गुलिस्ता नगर) अशी त्यांची नावे आहेत.हे दोघेही कापडी पिशवीत प्रत्येकी दोन किलो वजनाचे गांजाचे ६ बंडल घेऊन रहाटगावहून पंचवटी चौकाकडे येत होते.वेलकम पॉईंटवर आधीच सापळा रचलेल्या पोलीस पथकाने रात्री ९.४५ च्या सुमारास त्यांना ताब्यात घेतले व गांजा जप्त केल्यानंतर दोन्ही आरोपींना मालासह गाडगेनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.पोलीसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदा-१९८५ च्या कलम २०,२२ आणि २९ अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी व पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस आयुक्त प्रशांत राजे व गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय योगेश इंगळे,पोहेका अजय मिश्रा व शैलेश भगत यांनी केली.नापोका दिनेश नांदे व निलेश येरणे,पोका अमोल बहाद्दरपुरे,राजिक रेयलीवाले,निखिल गेडाम व छायाचित्रकार सुधीर गुडधे यांच्या द्वारा केली गेली.