
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा तालुक्यातील माळेगाव येथील ग्रामपंचायतअंतर्गत विविध विकासकामांत अपहार झालेल्या निधीची चौकशी करावी, या मागणीसाठी ग्रामस्थ नितीन राठोड यांनी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांना दिले निवेदन . निवेदनात ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना माहित अधिकारात माहिती मागितली असता त्यांनी दिली नसुन गटविकास अधिकारी यांनी बगल देत प्रथम अपील द्वितीय अपिल करूनही अर्ज बेदखल केला असुन मंत्री महोदयांनी चौकशी करावी अशी मागणी ग्रामविकास मंत्री कार्यालय मुबंई येथे केली आहे.