
दैनिक चालु वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
उर्दू ,हिंदी,मराठी आणि अरबी भाषांवर प्रभुत्व.
जबरदस्त वक्ते,एक भावमयी कवी,एक क्रियाशील समाजसेवक, एक उत्कृष्ट सूत्रसंचालक
राज्य ,राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना विविध पुरस्कारने गौरव
म्हसळा – लक्षावधी शिक्षक आपापल्या ठिकाणी इमाने इतबारे आपली सेवा बजावतात.सेवाकाळात केलेल्या कामांमुळे काही लक्षात राहतात.कुणी काही कारणानी तर कुणी नको त्या कारणांनी लक्षात राहतात.पण काही शिक्षक आपल्या कर्तबगारीने लक्षात राहतात.त्यातलेच एक अजोड असे शिक्षक म्हणजे म्हसळा शहरातील शाहीन उर्दू प्रायमरी स्कूल चे मुख्याध्यापक श्री.मुबश्शिर सर हे आहेत.
शाहीन उर्दू प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक म्हणून शाळेला दिलेली भरभराट ही त्यांच्या उत्तुंग कार्याची पोचपावती आहे.
श्री.मुबश्शिर जमादार सर हे एक हरहुन्नरी शिक्षक म्हणून प्रख्यात आहेत.उत्तम संघटक,एक आदर्श शिक्षक,एक जबरदस्त वक्ते,एक भावमयी कवी,एक क्रियाशील समाजसेवक, एक उत्कृष्ट सूत्रसंचालक ,शासनाच्या बदलत्या शैक्षणिक धोरणांनुसार आपल्या शाळेचे धोरण ठेवणे हे सर्वांना जमत नाही पण जमादार सरांनी ते केले.
उर्दू ,हिंदी,मराठी आणि अरबी भाषांवर प्रभुत्व ठेवत शिक्षण क्षेत्रातील सर्वच प्रशिक्षण सत्रांमध्ये एक सर्वोत्कृष्ट तज्ञ मार्गदर्शक म्हणून मुबश्शिर सरांनी केलेले काम अविस्मरणीय आहे.
विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च पदांवर काम करताना तेथेही आपल्या विशिष्ट कार्यपद्धतीची छाप सोडलेली आहे.
एक शिक्षक म्हणून सामाजिक बांधिलकी जपणेही महत्वाचे आहे.मुबश्शिर सरांची जिथे जिथे गरज पडली तिथे तिथे सरांनी काम केले.चक्री वादळात उद्ध्वस्त झालेल्रा अनेक कुटुंबांनां सरांनी मदत मिळवून देण्यात अहोरात्र धडपड केली.
राज्य ,राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले आहे.
तीन दशके एकाच शाळेवर सर्वांना सोबत घेऊन
यशस्वी कामाचा विशेष ठसा उमटवणारे आदर्श शिक्षक श्री.डाॅ.मुबश्शिर जमादार हे म्हणूनच वेगळे ठरतात. मुबश्शिर सर हे 28 फेब्रुवारी 2023रोजी आपल्या सेवेतून सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमासाठी आ.अदितीताई तटकरे या स्वतःउयपस्थित होत्या.एका भव्य कार्यक्रमात मुबश्शिर सरांना निरोप देण्यात आला.
अशा एका आदर्श शिक्षकाच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांच्या कार्यांची दखल घेणे आवश्यक ठरते.श्री.मुबश्शिर सरांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!!
जिजामाता मराठी माध्यमिक शाळा आगरवाडा
वतीने मुख्याद्यापक श्री संदिप कांबळेकर सह्य शिक्षक संदीप सुतार, अंगद कांबळे, नितीन म्हस्के, दिपक म्हात्रे, अंकुश गाणेकार, लक्ष्मण गाणेकर यांच्या वतीने हि सरांना पुढील वाटचालीस शुभेच्या व आपल्या कामाचा आदर्श नेहमी आमच्या पुढे असेल.