
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा शेतकऱ्यांचा खरीपाच्या जुगारा नंतर आता रब्बीचा जुगारास सुरुवात हवामान बदलले आणि होणारा अवकाळी पाऊस यामुळे मंठासह परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या काढणीला वेग दिला आहे. रब्बी हंगामातील जी पिके काढण्यासारखी असतील ते काढण्यावर भर दिला जात आहे. गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांच्या काढणीसाठी मजूर मिळत नाहीत. कारण प्रत्येक शेतकरी गहू ज्वारी, हरभरा काढण्यासाठी घाई करीत आहे. त्याला पर्याय म्हणून यंत्राच्या सहाय्यानेच पिके काढण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. एकंदरीत शेतकऱ्यांची मालाची गंजी झाकण्यासाठी तारांबळ उडाली असुन काढून टाकलेल्या पिकाची पसर पडल्याने धावपळ होत असून मिरची, कांदा, वांगी, गहू, हरभरा टरबूज, ज्वारी, करडी आदी पिकांची लागवड केलेल्या शेतकयांच्या नजरा बदलत्या हवामानाकडे असतात. आपले नुकसान होणार नाही ना? अशी चिंता शेतकऱ्यांना कायम सतावत असताना सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस झाल्याने बहुतांशी शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, टरबूज, कांदा, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाले झाल्याने .बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. उध्वस्त झालेली पिके बघून बळीराजा रडकुंडीस आला आहे.