दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी-विजयकुमार चिंतावार.
संकल्प अकॅडमीच्या स्तूत्य उपक्रमांतर्गत ८ विद्यार्थ्याना मिळणार एका शैक्षणिक वर्षाचे मोफत शिक्षण.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व विज्ञान दिवस या औचीत्य साधत शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय स्कॉलरशिप चाचणी व ॲकॅडमी मधील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धात्मक परीक्षेत सर्वाधिक गुण घेऊन यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना एका शैक्षणिक वर्षाचे एक वर्षाची खाजगी शिकवणीचे शुल्क न घेता विनामूल्य खाजगी शिकवण दिले जाणार आहे.
संकल्प ॲकॅडमी च्या वतीने दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी बहुपर्यायी (एम सी क्यू) पद्धतीने १०० गुणांच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या इयत्ता नुसार अभ्यासक्रम ठेवण्यात आलेला होता. शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांनी ही मोठ्या प्रमाणात उत्सफूर्द प्रतिसाद नोंदवित मोठ्या संख्येने परीक्षेसाठी सहभाग नोंदविला होता यात एकूण ४१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या सहा विद्यार्थ्यांना एका शैक्षणिक वर्षाचे खाजगी शिकवणीचे शिक्षण हे एक रुपया पण शुल्क न आकारता विनामूल्य खाजगी शिकवण देण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजी विज्ञान दिवस व शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात ॲकॅडमीमध्ये साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य कसे प्राप्त करावयाचे याबाबद मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात ही विज्ञान प्रदर्शनाने केल्या गेली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.ॲकॅडमी मधील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी 64 विद्यार्थ्यांनी स्वतःचे वक्तृत्व सादर केले. वक्तृत्व स्पर्धेचे प्रशिक्षक म्हणून गोविंद अंभोरे (शिवव्याख्याते) संचालक शब्दनाद भाषण कला प्रशिक्षण वर्ग, नांदेड यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना कला ही माणसाला जीवन जगण्याची प्रेरणा देते असे सांगत प्रत्येक विद्यार्थ्याने एक तरी कला अंगीकारावी असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच विज्ञान क्षेत्रातील लहानात लहान गोष्ट विद्यार्थ्यांना पटवून सांगत डॉ. व्ही. डी. माने (देशमुख) यांनी पण विद्यार्थ्यांना जीवशास्त्र या विषयावर मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना जादूचे प्रयोग दाखवण्यासाठी डी. जे. तवटे यांची ही उपस्थिती लाभली होती.जादूच्या मागील असणारे विज्ञान हे विद्यार्थ्यांना समजावून सांगत असताना या जादूच्या प्रयोगातून तवटे सरांनी सर्व विद्यार्थ्यांचे मने जिंकून घेतली होती.
संकल्प ॲकॅडमी च्या या सर्व स्पर्धात्मक स्कॉलरशिप परीक्षेत व वक्तृत्व स्पर्धेत अधिक गुण प्राप्त करून ४१३ पैकी ६ व ६४ पैकी २ असे एकूण ८ विद्यार्थी शैक्षणीक वर्ष असलेल्या एका वर्षाच्या विनामुल्य खाजगी शिकवणी करीता पात्र ठरलेले विद्यार्थ्याची नावे पुढील प्रमाणे आहेत श्लोक बालाजी कांगटे (वर्ग तिसरा),
विश्वास बालाजी कळवाने (वर्ग चौथा), आशिष कुमार रमेश झुंझारे (वर्ग पाचवा), कृष्णा शंकर कोरंटल्लू (वर्ग सहावा),मिजबा फलक (वर्ग सातवा),
अविनाश गजानन चितकेश्वर (वर्ग आठवा)
यांनी यश मिळविले तर वक्तृत्व स्पर्धेचे विजेते प्रतीक्षा डोईफोडे (वर्ग पाचवा), आणि वैष्णवी तवटे (वर्ग सहावा).संकल्प अकॅडमीचे संचालक कुशल देशमुख आणि सतीश देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पावडे , जाधव, वाघमारे,एजाज शेख, अर्सलान कासिफ यासह इयत्ता अकरावीतील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
या उपक्रमाप्रमाणे इतरही खाजगी शिकवणी चे वर्ग आहेत त्यांनीही अशाप्रकारे सामाजिक उपक्रम घेऊन आपल्या ॲकॅडमीत उपक्रम ठेवावेत.
