
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा : – लोह्यापासुन काही अंतरावर असलेले पांगरी हे गाव तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरात अखंड हरीनाम सप्ताहसाठी अनेक वर्षांपासून नावलौकिक आहे. जणु काही पांगरीचा सप्ताह म्हणलं कि श्रोते मंडळीसह भावीक भक्तांचे मन आठ दिवसांचा सप्ताहाचा कार्यक्रम पाहण्यासाठी वाचलीत होते. अनेक वर्षांपासून चालत असलेल्या पांगरी येथील अखंड हरीनाम सप्ताहाची सुरूवात बुधवार पासुन झाली असुन या सप्ताहामध्ये संत तुकाराम महाराज बीज उत्सव सोहळा , एकनाथ महाराज षष्ठी , तिथीप्रमाणे रयतेचे राजे छत्रपती शिवरायांची जयंती असा ञिवेणी संगम या सप्ताहात पहावयास मिळतो . दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण अखंड हरीनाम सप्ताहाचे भव्य दिव्य आयोजन गांवकरी मंडळी पांगरी यांच्यावतीने करण्यात आले असुन यांमध्ये पहाटे काकडा भजन , गाथा भजन , दुपारी रामकथा , हरीपाठ व संध्याकाळी महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार मंडळींचे किर्तनाचे आयोजन करण्यात आले असुन मधुर वाणीतून श्री ह भ प राजन महाराज काशीद यांच्या रामकथेला सुरूवात झाली असुन सात दिवस दररोज रात्री ९ ते ११ यावेळेत महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार श्री ह भ प राजन महाराज काशीद , श्री ह भ प तुळसीदास महाराज देवकर श्री ह भ बापुसाहेब महाराज खवणे , श्री ह भ प दिपक महाराज बादाडे , श्री ह भ प योगेश महाराज आकात , श्री ह भ प कृष्णा महाराज राऊत , श्री ह भ प कृष्णा महाराज चवरे पंढरपूरकर यांचे सात दिवस किर्तन होतील व काल्याची किर्तनसेवा गुरूवर्य श्री ह भ प माऊली महाराज मुडेकर यांची होईल.
परीसरात श्रोते मंडळी , भावीक भक्त सामाजिक , राजकीय , शैक्षणिक , सर्वच क्षेत्रातील मंडळींनी या अखंड हरीनाम सप्ताहातील कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा आशी विनंती समस्त गांवकरी मंडळी पांगरी यांनी केली आहे.