
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे मंठा.तालुक्यात यावर्षी पावसाने कहर केला असून शेतकऱ्यांचे खरीप पिक पूर्णतः हातचे गेल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यामुळे खरीप हंगामाची कसर आता रब्बी हंगामात भरून काढू या प्रयत्नात व अपेक्षेत शेतकरी असताना शेतकऱ्यांचा हरभरा पीक निघताच हरभऱ्याचे भाव झपाट्याने व हमीभावापेक्षाही कमी आल्याने शेतकऱ्यांमध्ये सभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या शासकीय हमीभाव खरेदीकडे नजरा
लागल्या असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन कपाशी तुर पिक पूर्णता सडून बेकार झाल्याने तसेच रब्बी हंगामात सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध असल्याने मंठासह परिसरात हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या
तुलनेत यावर्षी रब्बीच्या
पेरणीत मोठ्या प्रमाणात वाढ दिसूनयेत आहे. अनेक शेतकऱ्यांचे हरभऱ्याचे पीक चांगले आले असून त्यामुळे चांगल्या उत्पन्नाचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहे. ज्या शेतकऱ्यांनी अगदी सुरुवातीला दिवाळीच्या आधी हरभऱ्याची पेरणी केली होती. तो हरभरा काढून तयार झाला आहे मात्र दरवर्षीच शेतकऱ्यांचा माल निघाला की शेतमालाचे भाव पाडणे ही शासनाची व व्यापाऱ्यांची पॉलिसी असून अगदी ठरल्याप्रमाणे यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांचे हरभरा पिक निघतात. व्यापाऱ्यांनी व शासनाने शेतकऱ्यांच्या हरभरा पिकाचे भाव पाडले आहेत. आठ पंधरा दिवसांपूर्वी सहा हजाराच्या वरून भाव असलेला व शासनाने ५३३५ रुपये आधारभूत किंमत जाहीर केलेला हरभरा आता चार हजाराच्या आत म्हणजे शासनाच्या हमीभावापेक्षाही कमी शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. आता शेतकरी शासकीय हमीभाव खरेदीची प्रतीक्षा करीत आहेत. सध्या हरभऱ्याला कमी दर असल्याने शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. शासनाकडून प्रत्यक्ष खरेदी सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांची नोंदणी केली जाते. यासाठी सातबारा उतारा चालू वर्षाचा पीक पेरणीचा अहवाल बँक खाते आधार कार्ड अशी कागदपत्रे द्यावी लागत असून शेतकऱ्यांना आता शासकीय खरेदीची प्रतीक्षा लागली आहे.