
दैनिक चालु वार्ता अहमद्पुर प्रतिनिधी-विष्णु मोहन पोले.
लातुर/अहमद्पुर: तालुक्यातील नरवटवाडी येथील विलास बळीराम नरवटे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एन. टी. सी.प्रवर्गातून रँक वन मध्ये येऊन उपजिल्हाधिकारी पदा साठी निवड झाल्या बद्दल मल्हार युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे विलास नरवटे यांचा सत्कार तथा सन्मान करण्यात आला.त्या प्रसंगी मल्हार युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजीव पाटील मुकनर,लातुर जिल्हाध्यक्ष नाना नरवटे,जिल्हा सरचिटणीस नंदराज पोले पाटील,विष्णु पोले,माली पाटील मोहगावकर,गणेश नरवटे, इतर समाज बांधव आणी संघटनेचे कार्यकर्ते उपस्तिथ होते.