
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) ;
राष्ट्रपीता महात्मा गांधी,राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खेड्याकडे चला असा संदेश देऊन खेड्यातूनच देशात क्रांती घडविली.आजवर खेड्यातल्या झोपडीतही रत्न जन्मल्याचे अनेक दाखले देता येतील त्याचे एक उदाहरण म्हणजे श्रीक्षेत्र साहूरच्या पंचरत्नांनी हे सिद्ध केले आहे असे गौरोद्गार अ.भा.श्रीगुरुदेव सेवामंडळाचे जिल्हा सेवाधिकारी प्रभाकर गायकवाड यांनी सत्कार प्रसंगी काढले.
गेल्या २५ वर्षांपासून या परिसरातील अनेक तरुण व्यसनाधीनतेने मृत्युमुखी पडून त्यांचा संसार ऊघड्यावर आला.म्हणून अ.भा.श्रीगुरुदेव सेवामंडळ गुरुकुंज आश्रमचे आजीवन प्रचारक रमेशचंद्र सरोदे यांनी गावातील सज्जनांना सोबत घेऊन ग्रामगीतेतील आदर्श होळी-धुलिवंनासाठी गावात ग्रामस्वच्छता करुन भजन दिंड्या व किर्तन प्रबोधन सुरु केले.यात आजी-माजी सरपंच प्रशांत काकपुरे,वनिता लवणकर,भावना खरडे यांनी मोलाची साथ दिली.सांवगा पुनर्वसन ला गावातील केरकचरा झाडून दिपक खरडे,सुलोचना सोनोने, रामराव लुंगे ,रमेश बिजवे व गावकर्यांनी होळी पेटविली.आज व्यसनांमुळे ऊध्वस्त झालेली अनेक कुटुंबीय मंडळी आयोजकांना धन्यवाद देत आहे.यावेळी गावोगावच्या गुरुदेव सेवामंळानी असा सोहळा साजरा करावा असे आवाहन गायकवाड यानी केले.
यापुर्वी सिमेवर लढणार्या सैनिकांचा व त्यांच्या माता-पित्यांचा तसेच झोपडीतल्या जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांचा सत्कार करुन २०२३ च्या सोहळ्यात गरिबीतून व कष्टातून वर आलेल्या डाॅ.वैभव प्रमोद काकपुरे,डाॅ.पल्लवी अरुण सांभारे,डाॅ.प्रणय बबन भोंड,पंकज रमेश पापडकर,दर्शन रामभाऊ तळहांडे,ऊज्वला गुणवंत पेंदाम,देवानंद सुधाकर ठाकरे या गुणवंतांचा व ग्रामगीताचार्य गंगाधर यावले,मनिष सरोदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला .
याप्रसंगी बाल किर्तणकार लोकेश महाराज चोपडे यांचे ग्रामगीतेतील आदर्श होळी व धुलिवंदन यावर प्रबोधन झाले. आष्टी ता.सेवाधिकारी तारेश बोडखे,ता.प्रचारक वसंत ढवळे गुरुजी,कृष्णा हरले साहूरकर,हरिभाऊ टाकळकर,सविता बोंदरे,लक्ष्मण सनेसर,मनोहर दंडाळे,पांडुरंग जाधव,लिलाधर अग्रवाल,गोपाल महाराज गावंडे,शरद महाराज वरकड,अशोक झोडे,चेतन भोरे,जागोराव भोरे,धनराज तुपकर यांची प्रमुख ऊपस्थिती होती.
यासाठी सरपंच भावना खरडे,प्रशांत काकपुरे, ईश्वर राऊत,दिपक काकपुरे,विनय तळहांडे,गोपाल चांदुरकर,राजकुमार दंडाळे,विवेक लाड,विजय खरडे, योगेश चांदुरकर,गोपाल भालेराव,ज्ञानेश्वर भोरे,राजेश खरडे,श्रीकृष्ण खिरटकर,नारायण टाकळकर,ज्ञानेश्वर घोटकर,प्रफुल बोबडे,सुधीर कांदे,विनोद सोनोने,संजय राठी,विनोद घोरपडे,विष्णुभाऊ घोटकर,सिताराम कांदे,हरिभाऊ वाघ,अशोक मुंदाने,पंजाबराव चांदुरकर,चंद्रशेखर लाड,राहूल खरबडे,कृष्णकुमार गोंधळे,रुपेश पेठे,प्रफुल नस्करी ,वैभव दळवी,आकाश पाटमासे,शंकर नांदने,राजेंद्र काटोले,प्रविण धांडे,जीवन भोरे,चंद्रशेखर बहरुपी,प्रशांत ढोले,हर्षल गोहत्रे,जय मिसाळ,चैतण्य वरकड,वत्सल दंडाळे, मिरा कोहरे व ईतरांनी परिश्रम घेतले. प्रास्तावीक व संचालन रमेशचंद्र सरोदे,आभार प्रदर्शन दिपक खरडे यांनी केले .राष्ट्रवंदना व प्रसादाने महोत्सवाची सांगता झाली.