
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी –
8 मार्च रोजी अॅड रविप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशानुसार व श्री. मारोतराव साहेबराव मगर प्रदेश अध्यक्ष व प्रदेश कार्याध्यक्ष मा. तय्यब सय्यद पटेल आणि प्रदेश सरचिटणीस मा. सुनील नानासाहेब ठोसर यांच्या नेतृत्वाखाली. मा. श्री रमेश पंडित राठोड रयत शेतकरी संघटना अहमदपुर तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भविष्यामध्ये आपण रयत शेतकरी संघटना बळकट करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्याल अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी रमेश राठोड यांनी सांगितले की संघटना वाढवण्यासाठी दिवसरात्र एक करणार आहे. तसेच
शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त न्याय मिळावा यासाठी काम करणार आहे असे सांगितले .त्यांच्या निवडीबद्दल दैनिक चालू वार्ता कंधार तालुका प्रतिनिधी माधव गोटमवाड तसेच केंद्रे प्रकाश व अजय भालेराव , विष्णु पोले, ST कर्मचारी विष्णू श्रीमंगले , धसवाडी ग्रामपंचायत येथील सरपंच दत्ता मिरगे , उपसरपंच लक्षण घोडके यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या