
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार :- पंतप्रधान सन्मान निधी योजनेअंतर्गत जमा होणारी निधी कंधार तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे बंद झाले असून तो निधी तात्काळ चालू करण्यात यावेत.अनेक शेतकऱ्यांना तिन चार हप्ते येऊन अनुदान बंद झाले असून ते अनुदान बंद होण्याचे कारण तपासून अनुदान मंजूर करून देण्यात यावे अशी मागणी गजानन तुकाराम जाधव राहणार पेठवडज ता. कंधार जि. नांदेड यांनी उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार कंधार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार यादव यांनी ज्या शेतकऱ्यांची नावे आली नाहीत त्यांचे नावे कळविण्याचे गजानन जाधव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयरोजगार यांना सांगितले आहे.तरी शेतकऱ्यांनी ८८८८६६९४३६ या नंबर वर संपर्क साधून आपले नाव कळवावे.