
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
सोलापूर/पंढरपूर:दिनांक ०८/०३/२०२३ रोजी मा. अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत सरंगल, महामार्ग पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, पोलीस निरीक्षक योगेश वेळापुरे, प्रभारी अधिकारी विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस मदत केंद्र, मोडनिंब यांच्या वतीने कनकंबा मंदिर करकंब ता. पंढरपूर येथे मृत्युंजय दूत यांची मीटिंग घेऊन वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट घालून सर्व्हिस रोड चा वापर करावा, ज्या ठिकाणी सर्विस रोड नाही तेथे साईट पटीच्या बाहेरून वाहन चालवावे, मद्यपान करून वाहन चालवू नये एखादा अपघात झाल्याचे आढळून आल्यास बघ्याची भूमिका न घेता जखमींना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी तात्काळ १०८ नंबर वर संपर्क करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी तसेच नजीकच्या पोलीस स्टेशनला व महामार्ग पोलीस मदत केंद्र येथे अपघाताची माहिती द्यावी. तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना, मृत्युंजय दूत संकल्पना बद्दल माहिती देऊन अपघाताची माहिती पोलिसांना तात्काळ द्यावी जखमींना वैद्यकीय मदत तात्काळ मिळेल यासाठी प्रयत्न करावेत असे मार्गदर्शन मोडनिंब पोलीस मदत केंद्राचे पोलिस अंमलदार गणेश शिंदे यांनी केले.
यावेळी मृत्युंजय दूत पोलीस पाटील नानासाहेब शिंदे,सुनील गायकवाड,प्रशांत खारे,साहिल कोरबू,शाहरुख कोरबू,,मनोज खारे,सागर गायकवाड, निखिल काकडे, नागेश खारे,दत्तात्रय मांजरे,परमेश्वर खारे, बाळासाहेब लोंढे,महेश शिंदे, पांडुरंग कदम,तुषार खाडे असे सर्व उपस्थित होते.