
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:-अंधोरी ता.अहमदपूर जि लातूर येथे महीला मेळावा व कृर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला तसेच आरोग्याबाबत स्वच्छतेबाबत आहाराबाबत सर्व महिलांना मार्गदर्शन करण्यात आले व कायदेविषयक माहिती किशोरी मुली व सर्व महिलांना सांगण्यात आले या कार्यक्रमात आहार प्रात्यक्षिक व तृणधान्यापासून तयार केलेले भरड धान्य तसेच तृणधान्यापासूनचे पदार्थ असे विविध आहाराचे प्रात्यक्षिक करण्यात आले कार्यक्रमात उपस्थित ग्रामपंचायत सदस्य म्हणून गुळवे सुशेलाबाई, कावळे मंगलबाई, माने कोंडाबाई , सुरेखाताई केल्याने , तसेच अंधोरीच्या L. H. V सूर्यवंशी मॅडम तसेच मंजुषा संजय कांबळे तसेच अंगणवाडी पर्यवेक्षीका शोभाताई केंद्रे तसेच अंगणवाडी सेविका अयोध्या कामखेडकर ,बालिका सुरसे, मेनका राठोड, तस्लिम शेख, मस्के मॅडम , कमल वागमारे ,नसरीन शेख अंधोरी-१मधील सर्व कार्यकर्त्यां,मदतनीस आदि उपस्थित होते तसेच कार्यक्रमाची नियोजन अंगणवाडी पर्यवेक्षिका केंद्रे एस के यांनी केले व आभार शेख तसलीम यांनी मानले