
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (धामणगाव रेल्वे) :आज काँग्रेस कडून राज्यभरात निषेध आंदोलन करण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे एलआयसी कार्यालयासमोर काँग्रेसने मोदी सरकारचा निषेध करत आंदोलन केले आहे.
केंद्रातील मोदी सरकारने निवडक उद्योगपतींवर मेहरबानी दाखवत सामान्य माणसाचा कष्टाचा पैसा धोक्यात आणला आहे.अदानी उद्योग समुहामधे एलआयसी,स्टेट बँक ऑफ इंडिया व सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांना कोट्यवधी रुपये गुंतवण्यास मोदी सरकारने भाग पाडले.एलआयसीचे २९ कोटी गुंतवणूकदार व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ४९ कोटी खातेदारांचा कष्टाचा पैसा परत मिळेल का? अशी भिती निर्माण झाली आहे.अदानी समूहातील गैरकारभारामुळे एलआयसीच्या ३९ कोटी पॉलिसीधारक व गुंतवणूकदारांचे ३३ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर बँकांनी मिळून तब्बल ८० हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.मोदी सरकारने काही खास उद्योगपतींसाठी नियम बदलून जनतेचा पैसा धोक्यात घालण्यास विरोध आहे.काँग्रेस पक्ष नेहमीच सामान्य जनतेच्या पाठीशी उभा राहिलेला आहे.अदानी उद्योग समुहातील गैरकारभाराची चौकशी व्हावी,यासाठी काँग्रेस पक्ष संसदेत आवाज उठवत आहे.
तसेच सिलेंडरची वाढती दरवाढ आणि शेतकऱ्याला हमीभाव या सोबतच विविध मागण्या घेऊन यावेळी आंदोलन करण्यात आले आहे.आंदोलन दरम्यान सरकार विरोधी घोषणाबाजी देखील करण्यात आल्या.सर्वसामान्य नेत्यांना वेठीस धरून ईडी,सीबीआय च्या माध्यमातून त्याचा आवाज दाबण्याचं काम सरकार करत असल्याने आणि सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे.यावेळी “केंद्रातील मोदी सरकारचा निषेध असो” “अदानी चोर है” “चौकीदार चोर है” “जनतेच्या पैशाला संरक्षण मिळावे” “भाजपा हटाव देश बचाव” अश्या घोषणा देत काँग्रेस कडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.