दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
पुणे : प्रतिनिधी: नुकताच साजरा झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्त देश विदेशात महिलांचा सन्मान होत असताना याच महिला दिनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या विविध विद्यापीठांमध्ये नोंदणी केलेल्या विद्यावाचस्पती (पीएचडीच्या) विद्यार्थिनींचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे समोर गेल्या चार दिवसांपासून फेलोशिप मागणी संदर्भात आमरण उपोषण सुरू आहे.
पीएच.डी. हा पाच वर्षांचा संशोधन
अभ्यासक्रम असून.इतरांना संशोधक संस्थांकडून याच अभ्यासक्रमासाठी पाच वर्षांसाठी फेलोशिप दिली जाते. बार्टीकडून मात्र तीनच वर्षे फेलोशिप दिली जात असल्याने हा निर्णय २०१८च्या तब्बल २१४ विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असल्यामुळे ही फेलोशिप ५ वर्षांसाठी देण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थीनींने
गतवर्षी ही उपोषण केले होते.
UGC,NFSC अधिछात्रावृत्ती नियमानुसार तसेच कोविड -19 व लॉकडाऊन या बाबींचा विचार करून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) २०१८ सालच्या पीएच.डी विद्यार्थ्यांना सलग ५ वर्षे पीएच.डी. फेलोशिप देण्यात यावी या संदर्भात वारंवार प्रशासन फक्त आश्वासन देत आहे.
२०१८ सालापासून हे पाचवे आंदोलन असून अजूनही बार्टीकडून कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थ्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
उपोषणाच्या पाचव्या दिवसांनंतर ही बार्टीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने उपोषणकर्त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास पुर्णपणे बार्टी प्रशासन व महाराष्ट्र शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी,असे उपोषणकर्ते सिद्धनाथ गाडे,संघप्रिया मानव,प्रतीक कांबळे, विश्वास माने, प्रतिभा थोरात, राहुल बनसोडे, पिराजी वाघमारे, प्रविण वानखडे, माधवी कांबळे, वंदना भिसे, संगिता वनखंडे, सविता पठारे, सरोज खंडारे,सुनिता शेजुळ, निखिल आठवले,अंकुश गवई यांनी सांगितले.
