
दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनिधी अंगद कांबळे
सालाबाद प्रमाणे शिवसेना उद्धव ठाकरे युवासेना आणि गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथी प्रमाणे साजरी करण्यात येणारी जयंती उत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.युवा सेना तालुका अधिकारी कौस्तुभ करडे,तालुका प्रमुख सुरेश कुडेकर,शहर प्रमुख अनिकेत पानसरे,उप प्रमुख दिपल शिर्के,शहर संपर्क प्रमुख अभय कलमकर,शहर संघटक कल्पेश जैन,युवा सेना चिटणीस राहुल जैन,शहर अधिकारी अजय करंबे आदी शिवसैनिकांनी आयोजीत केलेल्या म्हसळा बस स्थानक ते ग्राम दैवत श्री धाविर देव महाराज मंदीर पर्यंत फटाक्यांची आतषबाजी,ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवनुकिने छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा संपन्न झाला.सोहळ्यात वेशभुषा परिधान केलेले बालशिवाजी,मावळे झालेले बाल कलाकार,शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले कराटे प्रात्यक्षिक शिवजयंतीला प्रमुख आकर्षण ठरले.सोहळ्यात शिवसैनिक व शिवप्रेमी नागरीक ग्रामस्थ महीला भगिनींनी पारंपरिक वस्त्र परिधान करून सहभाग घेत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करून म्हसळे कराना शिवकालीन इतिहासाची आठवण करून दिली.