
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड /लोहा येथील शासकीय विश्रामगृह येथे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समीती निवडणुकीच्या संबंधाने रिपब्लिकन सेनेची महत्त्वपुर्ण बैठक पार पडली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार साहेबराव सोनकांबळे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्रीपती ढोले गुरुजी यांची उपस्थीती होती तर प्रमुख पाहुणे म्हणुन मराठवाडा संघटक अनिलदादा गायकवाड,दक्षिण जिल्हाध्यक्ष डाॅ.राजेश पंडीत,यांची उपस्थिती होती.
व मान्यवरांनी उपस्थीत कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
रिपब्लिकन सेनेची बैठक यशस्वी करण्यासाठी बुध्दभुषण खिल्लारे, रोहीदास जोंधळे,अमोल कांबळे,सचिन आढाव, राहुल एडके,गिरीष भालेराव,हनमंत खंदारे,विनोद तिगोटे आदींनी परिश्रम घेतले आहे