
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- नवनाथ डिगोळे
भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष मीना भोसले यांचे सखोल प्रास्ताविक व मार्गदर्शन
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा ,लातूर शहर च्या वतीने महिला मोर्चा प्रदेशध्यक्षा मा.चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनानिमित्त लातूर शहरातील विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना स्व.सुषमा स्वराज अवॉर्ड देऊन त्यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी लातूर शहराचे अध्यक्ष मा.गुरुनाथ मगे , प्रमुख पाहुणे म्हणून राखीभाभी शैलेश लाहोटी यांची उपस्थिती होती. महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा मीना भोसले यांनी आपल्या प्रस्ताविक मध्ये केंद्रसरकरच्या महिला साठीच्या योजना व राज्यसरकारचे बजेट याबद्दल माहिती दिली व आम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहोत याबद्दल आम्हाला अभिमान आहे असे सांगितले. जिल्हाध्यक्ष गुरुनाथजी मगे यांनी योग्य महिलांना सन्मानित केले या बद्दल आनंद वाटला व यापुढे त्या आणखी चांगल्या प्रकारे सामाजिक कार्य करतील अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस शोभाताई कोंडेकर यांनी केलं, महिलांच्या कार्याचा परिचय सोशल मीडिया संयोजिका संगीता शिंदे यांनी दिला व आभार या कार्यक्रमाच्या प्रमुख संतोषी मोरे यांनी मानले. या वेळी सरचिटणीस प्रगती डोळसे, रत्नमाला घोडके, अफ्रिन खान,नगरसेविका वायचळकर,स्वाती घोरपडे, श्वेता लोंढे, सर्व मंडल अध्यक्षा पदाधिकारी उपस्थित होत्या.
या वेळी प्रिया नाईक(समाजसेविका)
2)उर्वी नागुरे(डॉक्टर),
3)वर्षा सोनवणे(आश्रम),
4) दीपा पाटील(संवेदना प्रकल्प),
5)माधवी जोधवांनी (समाजसेविका)
6)मिनाक्षी काळे(आशा वर्कर)
7)ज्योती उपाद्धे(ऑटो रिक्षा चालक)
8)संगीता सुरवसे(परिवहन वाहक),
9)छाया शिंदे(स्वच्छता ताई),
10)उज्वला सादगिरे (महानगरपालिका सिस्टर),
11)प्रा.उर्मिला भांधगिरे, 12)संजीवनी नागमोडे (निसर्गोपचार केंद्र) शेतकरी
13) मानसी कुलकर्णी अधिक्षिका गोकुळ बालसदन
आदी महिलांना सन्मानित करून त्यांच्या कार्याची दखल घेतली.