
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-
पुणे बालेवाडी येथे आयोजित फार्मर वॉटर कप पुरस्कार सोहळ्यामध्ये बीड जिल्ह्यातील धारूर तालुका ,व्हरकट वाडी या छोटयाशा गावातील शेतकऱ्यांनी श्री संत बाळूमामा फार्मर ग्रुपच्या माध्यमातून जे पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून काम केल त्यामुळे त्यांना तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या गटाचे अध्यक्ष कैलास हरिभाऊ व्हरकटे,सचिव सुधाकर व्हरकटे,संदीपान लिंबाजी व्हरकटे,तातेराव व्हरकटे,अंगद सावरकटे,बलभीम सरकटे,अंगद करे इत्यादी शेतकऱ्यांनी पाण्या बद्दलची जागृती करून,आपल्या गटाच्या माध्यमातून खुप मोठे कार्य आपल्या गावामध्ये केले याच शेतकऱ्यांचा आदर्श घेऊन इतरांनी पण ह्या कार्यात सहभागी होने गरजेचे आहे.या शेतकऱ्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून आपल्या गावाचे तसेच तालुक्याचे नाव रोशन केले त्यामुळे त्यांचे पूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे