
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी -दीपक कटकोजवार
चंद्रपूर शहरातील न्यू इंग्लिश हायस्कूल ग्राउंड (दर्गा मैदान) येथे आज दि.१२/०३/२०२३ रोज रविवारला दुपारी ३ वाजता आदिवासी समाजातील अनेक महापुरुषांनी स्वातंत्र्य पूर्व काळात सुद्धा आपल्या भूमीसाठी प्राणाची आहुती दिली त्या महान क्रांतिविरांमधील एक नाव होते क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची क्रांति कार्य सुद्धा अनन्य साधारण होते परंतु इतिहासकारांनी आदिवासी समाजाच्या वीर शूर क्रांतीकारकांच्या इतिहासात नोंद घ्यायला जाणीवपूर्वक डोळेझाकपणा केल्याचे दिसून येते आहे. क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांचे क्रांतिकार्य घराघरात पोहोचण्याच्या उद्देशाने जयंती पर्व उत्सव साजरा करण्यात आला आहे त्याप्रसंगी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार किशोर भाऊ जोरगेवार दशरथजी मडावी एडवोकेट राजेंद्रजी मरसकोल्हे नंदू नागरकर बेबीताई उईके अशोक उईके मंचावर अनेक मान्यवर उपस्थित होते आणि आदिवासी समाजाचे बहुसंख्य बंधू आणि भगिनी उपस्थित होते