दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
सत्यमेव जयते फार्मर कप २०२२ पानी फाऊंडेशन तालुका स्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त बळीराजा शेतकरी बचत गटाचा नुकताच दि.१२ मार्च २०२३ रोजी रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमीर खान,किरण राव अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे बालेवाडी स्टेडियम येथे प्रथम क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
याचाच बहुमान म्हणून काल दि.१४ मार्च २०२३ रोजी तालुका प्रशासनाने ग्रामपंचायत शेलगांव (धा.) येथे भेट देऊन बळीराजा शेतकरी गटाचा,सर्व पदाधिकारी, सदस्यांचा सन्मान केला. यावेळी तहसिलदार व्यंकटेश मुंडे, गटविकास अधिकारी शैलेश वाव्हळे, जेष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी सर्जेराव टेकाळे, बांधकाम अभियंता गायकवाड,पं.स.चे माजी सभापती नरेंद्र गायकवाड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब कराळे, शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश पाटील हिलाल यासह आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.लक्ष्मीबाई मारोतराव कदम होत्या.मान्यवरांनी ग्रामस्थांना सखोल मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी शेलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ६ व्यक्तींना प्रशिक्षणासाठी कळमनुरी जि.हिंगोली येथे पाठवून दिले.त्यामधे विहिरीचे मोजमाप करणे,उताराला नांगरणी करणे,उत्तम बियाना निवडणे,एकत्र खत बियाणे व औषध खरेदी करणे,बी.बी. एफ पद्धतीने पेरणी करणे,चिकट सापळे,कामगंध सापळे, वापरले,दशपर्णी अर्क व निंबोळी अर्क,फावरणे,बियाणांची उगवण क्षमता करणे,एकत्र येऊन काम करणे रासायनिक खताचा वापर कमी करणे गटाने सार्वजनिक कामे करणे तसेच विषमुक्त शेती करणे व शेतकरी डायरी ठेवणे म्हणजेच उत्पन्न वाढवणे व खर्च कमी करणे ही कामे केली.सोयाबीनची विषमुक्त तपासणी केली.चाळणी यंत्र घेतले दर रविवारी शास्त्रज्ञांच्या शेती शाळा केल्या आदींची दखल घेऊन पानी फाउंडेशनच्या बळीराजा शेतकरी गट शेलगाव (धा.)यांना एक लक्ष रू.व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आले.
गटाचे अध्यक्ष एकनाथ कदम, रामेश्वर कदम, गोपाळ कदम, भुजंग कदम, विश्वंभर कदम, मोतीराम कदम ज्ञानेश्वर कदम, माणिक कदम, संगीता कदम, भागवत कदम, नवनाथ मिटकर, तुकाराम कदम, केशव कदम, शंकर कदम, मगदूम शेख, जनार्दन कदम, बाबूराव कदम, कल्याण कदम, हरी कानोडे, चक्रधर कदम, शेलगावचे सरपंच मारोती पाटील कदम पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक राजाभाऊ कदम यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तर गांवकरी मंडळींच्या वतीने शेलगाव येथे भव्य दिव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील कार्यक्रमास पांडुरंग पाटील बोरगावकर, ह.भ. प.संभाजी महाराज मडकीकर, सरपंच सौ.लक्ष्मीबाई कदम, मारोतराव कदम,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, सेवा.संस्थेचे चेअरमन, व्हॉईस चेअरमन, तंटा मुक्ती समिती अध्यक्ष,सर्व शिक्षक,ग्रामविकास अधिकारी, बळीराजा शेतकरी गटातील सर्व पदाधिकारी, गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मारोतराव कदम यांनी मानले.
