
दैनिक चालू वार्ता भु म प्रतिनिधी -नवनाथ यादव
भु म:-महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री शिवजलक्रांतीचे प्रणेते, विकासरत्न मा.ना. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १५ मार्च २०२३ रोजी भैरवनाथ शुगर वर्क्स लि. शिवाजीनगर, सोनारी, ता. परंडा येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते. रक्तदान शिबीराचे उद्घाटन मा. श्री. धनंजय (दादा) सावंत मा. उपाध्यक्ष जि.प. धाराशिव तथा कारखान्याचे कार्यकारी संचालक व मा. श्री.दत्ता आण्णा साळुंके मा. सभापती दुग्ध व पशुसंवर्धन जि.प. धाराशिव यांचे शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस पुच्छहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करून करण्यात आले. या शिबीरामध्ये २०१ रक्तदात्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. या शिबीराचे वैशिष्ट्य म्हणजे महिला रक्तदात्यांनी सुध्दा उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. श्रीमान रामभाई शहा ब्लड बँक बार्शी व भगवंत ब्लड बँक, बार्शी यांनी रक्तसंकलनाचे कार्य केले.
यावेळी सर्व श्री. आण्णासाहेब जाधव शिवसेना तालुका प्रमुख परंडा, सतीश दैन मा. सभापती पं. स. परंडा, सतीश मेहर मा. नगरसेवक परंडा, राहुल डोके युवासेना तालुका प्रमुख परंडा, दत्ता रणभोर महाराज मा.नगरसेवक, जयदेव बप्पा गोफणे शिवसेना संघटक परंडा तालुका, बाळासाहेब गायकवाड शिवसेना शहरप्रमुख परंडा, वैभव पवार युवासेना शहरप्रमुख परंडा, पै.आप्पासाहेब कारंडे युवानेते, शाम मोरे मा. उपनगराध्यक्ष, सौ. ताई लांडे शिवसेना महिला संघटिका परंडा, संजय पवार शिवसेना शहरप्रमुख भूम, संतोष भांडवलकर उपसरपंच वाटेफळ, औदुंबर गाडे युवानेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी श्री. प्रल्हाद ठोंबरे जनरल मॅनेजर, राजेंद्रकुमार काळे प्रॉडक्शन मॅनेजर, अजित भोसले डिस्टीलरी मॅनेजर, भगवान (दादा) काळे शेती अधिकारी, गोविंद कुलकणी चिफ अकौंटंट, विठठल सिरसट डिस्टीलरी मेंटेनन्स मॅनेजर, रविकांत सिंग चिफ इंजिनिअर, पाटील सिव्हील इंजिनिअर, मच्छिंद्र थिटे सिव्हील सुपरवायझर, दादासाहेब बोरकर चिफ केमिस्ट, श्री. सुभाष भोसले ईडीपी मॅनेजर, ए.सी. तिर्थे स्टोअरकिपर, सुरेश साळुंके हेड टाईम किपर व कारखान्याचे शेती विभाग, अकौंट विभाग व कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.