
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना : जालना शहरातील नगर परिषदेचे मुख्य गुत्तेदार एम. पी. पवार यांच्या मृत्यदेह घाणेवाडी जलाशयात आढळून आला. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. गुत्तेदार हे कालपासून गायब असल्याने त्यांचा शोध सुरू असताना आज त्यांची दुचाकी घानेवाडी जलाशय जवळ आढळून आल्या नंतर त्यांचा मृत्यदेह ही जलाशयात तरंगताना आढळून आला.
एम. पी. पवार हे जालना नगर परिषदेतील प्रमुख गुत्तेदार असून ते मंगळवारपासून बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू होता. याच दरम्यान त्यांचा मृत्यूदेह घाणेवाडी जलाशयात आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून जलाशयाजवल त्यांची दुचाकी आढळून आली असून तिला एक बॉटल असलेली बॅग लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले. अग्निशमन विभागाच्या मदतीने मृत्यदेह जलाशयाच्या बाहेर काढला असून शेविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
यापूर्वीही एका नगर परिषदेच्या गुत्तेदारांना विषारी द्रव्य पिऊन सोशल मीडियावर नगर परिषदकडून बिल मिळत नसल्याने आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला होता. त्यानंतर ही घटना घडल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.