
दैनिक चालू वार्ता भुम प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम :- तालुक्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी बांधव आपल्या हक्काची जुनी पेन्शन लागू करून नवीन पेन्शन रद्द करावी या मागणीसाठी बेमुदत संपावर आहेत.कर्मचारी यांच्या संपास व मागणीला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण (दादा) रणबागुल यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष मुसाभाई शेख ,युवक जिल्हा उपाध्यक्ष वैभव गायकवाड ,शहर अध्यक्ष रोहित गायकवाड, शहर उपाध्यक्ष जहीर शेख, शहर महासचिव सचिन शिंदे, शहर सचिव अजित शिंदे ,तालुका उपाध्यक्ष महावीर बनसोडे ,युवा नेते धीरज शिंदे ,अक्की गायकवाड, अजय थोरात, अजय गायकवाड आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.