
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भु म:- तालुक्यातील वाल्हा येथील दशरथ संभाजी काशीद यांना वैद्यकीय उपचाराकरिता दोन लाख रुपये ची आर्थिक मदत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत साहेब यांनी केली. रुग्ण हीच ईश्वर सेवा या प्रमाणे सावंत साहेब यांनी दिलेल्या शब्दा नुसार मागील काही दिवसा पूर्वी संभाजी काशीद यांना सर्प दंश झाला होता.तर परिस्थिती हालाकीची असताना आरोग्य मंत्री सावंत साहेबांना फोन केला असता मी मदत करतो असे जाहीर केली , तर वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषेदेचे उपाध्यक्ष मा.धनंजय दादा सावंत यांच्या हस्ते ती मदत चेकच्या स्वरूपात देण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख दत्ता बापू मोहिते, तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ, शहराध्यक्ष संजय पवार, माजी सरपंच विशाल ढगे, युवा सेना तालुकाध्यक्ष निलेश चव्हाण, युवा नेते श्रीहरी दवंडे, कंडारी गावचे सरपंच राहुल डोके ,निलेश शेळवणे,बालाजी शेळवणे, युवराज शेळवणे,अमित शेळवणे,सुशेन जाधव ,जयदीप गोपने , सतिश दैन माजी सभापती,संतोष भांडवलकर उपसरपंच ,आप्पा करंडे, शिवराज्य युवा प्रतिष्ठान वाल्हा, ग्रामस्थ उपस्थित होते.सतत आपल्या कार्यातुन कर्तृत्व आणि जबाबदारी दाखवून देणाऱ्या आरोग्य मंत्री साहेबांच्या या कार्याला सलाम गावकऱ्यांच्या वतीने मानले आभार.