
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :जिल्ह्यातील शासकीय,निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी १४ फेब्रुवारी पासून संप पुकारला असून संपाबाबत सरकारने अद्यापही कुठलाही निर्णय न दिल्याने एकच मिशन,जुनी पेन्शन या घोषणेसह १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाभरातील शासकीय,निमशासकीय कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत.मोर्चा दरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीसांचा कडक बंदोबस्त तैनात असणार आहे.सदर मोर्चा हा नेहरू मैदान वरून निघणार असून राजकमल चौक,शाम चौक,जयस्तंभ चौक,मालवीय चौक,इर्विन चौक,गर्ला चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे.शासकीय,निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाला सलग तीन दिवस झाल्याने सर्व कार्यालयीन कामकाज ठप्प आहे.त्यामुळे नारिकांमध्ये सुद्धा रोष व्यक्त करण्यात येत आहे.आता तरी सरकार कर्मचाऱ्यांच्या या मागणीला होकार देणार का याकडे राज्यातील सर्व शासकीय,निमशासकीय कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.