
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
नांदेड : – राज्यात अवकाळी पावसासह काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. या पावसामुळं शेतकरी चिंतेत आहेत.रब्बी पिकाचं तसेच फळबागाचं व पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं बळीराजा संकटात सापडला आहे. तात्काळ पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यात जोरदार वारे, मेघगर्जना, गारांसह विजांसह वादळी पावसाने दणका दिला आहे. रब्बी पिकांची काढणी सुरू असून, पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या मध्ये रब्बी ज्वारी, मका,, गहू, हरभरा, करडई, ज्वारी, स्ट्रॉबेरी, टोमॅटो, केळी, आंबा, काजू, पपई, आंबा, संत्रा, पेरू , केळी व इतर पालेभाज्यांचे समावेश आहे.
राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने घरांची पडझड झाली असुन विज पडून काही ठिकाणी जनावरे पण दगावली आहेत. राज्यभरात संबंधित विभागातील तहसीलदार तलाठी यांना तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा अशी मागणी आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांनी केली आहे.
विदर्भ, मराठवाडा, नाशिक, उत्तर महाराष्ट्र, कोकण, प. महाराष्ट्र, मुंबई नांदेड , हिंगोली , परभणी , सोलापूर , अहमदनगर , रायगड , बारामती, जालना , पुणे , बुलढाणा , धुळे , साताऱ्यासह अनेक जिल्ह्यांत गारपिटीमुळे शेतमालासह मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. मराठवाडा आणि खान्देशात अवकाळीशी संबंधित दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा मृत्यू झाला.
15 ते 19 मार्चदरम्यान राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस 0पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी बांधवांनी पावसाची शक्यता असल्याने पिकांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असे आव्हान आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांनी केले आहे.