दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भू म:- राज्यभर सुरू असलेला कर्मचाऱ्यांच्या संपास राजकिय पक्षांचा व विविध संघटनेचा पाठिंबा वाढताना दिसत आहे.पंचायत समिती भूम येथे चालू असलेल्या जुनी पेन्शन योजना आंदोलनास भू म कांँग्रेस कमेटी व विधानसभा युवक कांँग्रेस भूम-परंडा-वाशी च्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष विलासजी शाळू, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रुपेश शेंडगे,कार्याध्यक्ष ॲड सिराज मोगल यांनी आपले जुने पेन्शन योजना लागू करण्याबाबत मागणी केले. विधानसभा व काँग्रेस उपाध्यक्ष मोईज सय्यद ,ओबीसी विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर डोंबाळे, किसान विभागाचे तालुकाध्यक्ष राम सावंत, अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष शेरखान पठाण व सर्व कर्मचारी बांधव व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत.
