
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी –
आष्टी(श)(वर्धा): वरूड येथील (जि.अमरावती) फिन केअर स्मॉल फायनान्स बँकेच्या नावावर १ लाख रुपये तात्काळ कर्ज मंजूर करून देण्याच्या नावावर धाडी येथील बचत गटाच्या १५ महिलांना प्रत्येकी ४ हजार ३५० रुपये गैरमार्गाने वसूल करत फसवणूक केली याबाबत पहिली तक्रार १७ मार्च तर दुसरी तक्रार २३ मार्च रोजी आरोपीचे अंदाजे वर्णन देत दाखल केली आहे त्यामुळे सदर फसवणूक प्रकरणाला एक वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे या फसवणूक प्रकरणाला न्याय मिळण्यासाठी सर्वप्रथम दै.चालू वार्ता मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले त्यात आरोपीचे भेटी प्रसंगीचे फोटो,मोबाईल नंबर,दुचाकी क्रमांक बचत गटाच्या महिलांकडे उपलब्ध आहेत त्यामुळे आष्टी पोलिसांना आरोपी पर्यंत पोहोचणे सहज शक्य असल्याचे बचत गटाच्या महिला मध्ये चर्चा आहे मात्र सात दिवस लोटूनही आष्टी पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी दाखवलेली असमर्थता
निराजनक आहे त्यासाठी आष्टी पोलिसांनी शक्य तितक्या लवकर संशयित आरोपींना पकडणे जिकरीचे झाले आहे अशी चर्चा नागरिकात ऐकायला मिळत आहे