
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आर्णी येथे तहसील कार्यालयात आर्णी मा, तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले देशात ठराविक शहरांच्या नामांतराचे सत्र सुरू झाले आहे. त्याचे लोण आता महाराष्ट्रात सुद्धा आले आहे. नामांतराचे कुठे समर्थन तर कुठे विरोधही पाहायला मिळत आहे. मात्र
संभाजी नगर येथे काही संघटनेच्या वतीने औरंगाबाद चे संभाजी नगर करण्यात आलेल्या नामांतराच्या समर्थनात मोर्चा काही दिवसाआधी काढण्यात आला होता. या मोर्चा मध्ये समस्त बहुजनांची अस्मिता असणाऱ्या निळ्या झेंड्याला रस्त्यावर टाकून त्याची विटंबना करण्यात आलेली होती. या घटनेची चित्रफित संपूर्ण समाज माध्यमांवर उपलब्ध असून घडलेला प्रकार हा अनवधानाने झालेला नसून जाणीवपूर्वक सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचे अपराधिक कृत्य काही समाजकंटकांनी केलेले आहे. त्यामुळे आमच्या सामाजिक भावना अतिशय तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहे. तेव्हा संबंधित अपराधिक कृत्य करणाऱ्या समाज कंटकांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात अनुसूचित जाती व जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत कारवाईची मागणी आर्णी तहसील कार्यालयाचे तहसिलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे गृह मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यावेळी संजय भगत,गणेश हिरोळे, प्रशिक मुनेश्वर,आकाश रोडे, पवन कांबळे,सुमित पानतावने,ऋतिक नगराळे,विनित कांबळे,नविन कांबळे,सुरज गवई,रमेश कांबळे,प्रफुल दवने,क्षितिज भगत,प्रथम पाईकराव, तन्मय बागुल, कुलदीप गायकवाड, आकाश धोंगडे,भारत गायकवाड, वैभव गायकवाड, संघर्ष ओंकार यांच्या सह आदि समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.