
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
नांदेड : – जिल्हा परिषद शाळांतील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी, हवाई सफर घडावी , शास्त्रज्ञांच्या कार्यपद्धतीची ओळख व्हावी , यासाठी स्पर्धा परीक्षेद्वारे प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात केंद्रावर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते . हि परीक्षा पाञ झालेल्या विद्यार्थ्यांना अंतरिक्ष केंद्र श्रीहरीकोटा, थुंबा स्पेस म्युझियम तिरुअनंतपूरम केरळ विश्वेश्वरय्या इंडस्ट्रीयल ॲन्ड टेक्निकल म्युझियम बेंगळुरू येथे शैक्षणिक सहलीसाठी खर्च शासनाकडून करण्यात येणार असुन या सहलीसाठी पेनुर येथे ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सिध्दी रावसाहेब गवते या विद्यार्थ्यांनीची निवड झाली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारी सिध्दीची जिल्हास्तरीय ISRO परीक्षेमध्ये विशेष श्रेणीतून श्रीहरीकोटा सहलीसाठी निवड झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी सतिश व्यवहारे , अंबलवाड मॅडम , शेवडीचे केंद्रप्रमुख नागोराव जाधव , जिल्हा परिषद शाळा पेनुरचे मुख्याध्यापक बालाजी काळेकर , विज्ञान शिक्षीका सौ चव्हाण , सौ कदम , शालेय व्यवस्थापन समिती सह , शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मारोती ऐजगे , माजी सरपंच गंगाधर पाटील गवते , दैनिक चालु वार्ताचे नांदेडचे उपसंपादक गोविंद पाटील पवार दैनिक समिक्षचे पञकार विरभद्र एजगे , शाहरुख पठाण आदिंनी सिध्दी शैक्षणिक सहलीसाठी पाञ झाल्याबद्दल व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.