
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी -संतोष भसमपुरे.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त मराठवाड्यातील बहुप्रतिक्षित असलेला नांदेड लातूर रेल्वे मार्ग होईल का ?असा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून मराठवाड्यातील अर्थमंत्री आणि रेल्वे मंत्री असूनही तो अजूनही त्या मार्गाच्या कामाला सुरुवात झाली नाही. विधानसभेच्या लक्षवेधी मध्ये माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण यांनी हा प्रश्न प्रखरतेने मांडला .त्याच पार्श्वभूमीवर लातूर आणि नांदेड जिल्ह्यात जनमानसात चर्चेला सुरुवात झाली आहे.लातूरचे सुपुत्र अर्थ राज्यमंत्री आणि जालना जिल्ह्यातील सुपुत्र रेल्वे राज्यमंत्री असताना मराठवाड्यातील हा रेल्वे मार्ग का होत नाही ?केंद्रीय मंत्रिमंडळात मराठवाड्यातील दोन्ही मंत्री असून त्यांनी हा प्रश्न असा धगधगत ठेवणे योग्य नसल्याचे जनतेत सुर उमटत आहेत.सध्या लातूर आणि नांदेड जिल्हा रेल्वे मार्ग २१२ km असून प्रवासासाठी 6 तास लागत आहेत परंतु लातूर अहमदपूर लोहा नांदेड हा अंतर अवघा 100km च्या आतील असून हा मार्ग झाला तर एका तासात प्रवास होईल तसेच या भागातील शेतकरी ,कामगार ,व्यापारी आणि प्रवासी वर्गाला सोयीचे होईल .लातूर जिल्ह्यातील आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व क्षेत्रात हा मार्ग एक विकासाची उंची गाठून देणार ठरणार आहे, परंतु केंद्रीय नेतृत्व हा प्रश्न सोडवत नसल्याची खंत दोन्ही जिल्ह्यातील नागरिकात दिसून येत आहे . जनमानसाची भावना लक्षात घेता माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण यांनी महाराष्ट्र विधान भवनात हा प्रश्न लक्षवेधी मध्ये मांडला असून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात प्रस्ताव तात्काळ केंद्र सरकार कडे पाठवून सकारात्मक भूमिका घेतली आहे.आता मराठवाड्यातील अर्थमंत्री आणि रेल्वे मंत्री या बाबत काय निर्णय घेतात ते पाहणे आवश्यक आहे.