दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
कंधार तालुक्यातील उमरज येथील नामदेव महाराज संस्थानास निधी मंजूर करावा. यासाठी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता एकनाथ पवार यांनी पुढाकार घेतला. यासाठी त्यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांच्या माध्यमातून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले. आ. भारतीय यांनी उमरज संस्थानाला निधी देत एकनाथ पवार यांच्या प्रस्तावाला प्राधान्य दिले. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता एकनाथ पवार यांच्या माध्यमातून व विधान परिषद आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांच्या सहकार्याने उमरज येथील नामदेव महाराज संस्थान परिसरात किर्तन सभामंडप, पुजारी निवास, हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
